Breaking News

गुगल सीईओ पिचाईंचा काल सन्मान तर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल बॉलीवूड दिग्दर्शक सुनिल दर्शन यांच्या तक्रारीवर अखेर गुन्हा

मराठी ई-बातम्या टीम

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांना भारत सरकारच्यावतीने पद्म पुरस्कारच्या यादीत नाव जाहीर करत सन्मान केला. मात्र आज त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुंदर पिचाई यांचे व्यापार आणि उद्योग या श्रेणीतील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी मुंबईत गुगलचे सीईओ पिचाई आणि गुगलच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी २५ जानेवारी रोजी ही तक्रार नोंदवण्यात आली. यासंदर्भात दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितले की, निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुनील दर्शन यांचा शेवटचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला होता. यूट्यूब आपल्या चित्रपट आणि संगीताच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि त्यासाठी ते ११ वर्षांपासून संघर्ष करत आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी आपल्या तक्रारीत, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट ‘एक हसीना थी एक दीवाना था’ यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली होती, असे त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले.

मी गेल्या ११ वर्षांपासून हे युद्ध लढत होतो. मी सरकारकडून गुगल आणि यूट्यूबच्या बड्या अधिकाऱ्यांना अनेक पत्रे, विनंत्या लिहिल्या, पण कोणी ऐकले नाही. कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे माझी तक्रार नोंदवायलाही कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि कोर्टाच्या आदेशानंतरच मी गुन्हा दाखल करू शकलो असे त्यांनी सांगितले.

मी गेल्या काही काळापासून फक्त हे युद्ध लढत आहे. याआधी मी एका वर्षात एक-दोन चित्रपट करायचो, पण मला वाटायचं की जेव्हा इतरांना असा फायदा व्हायचा असेल, तर आधी हे युद्ध का लढू नये असेही ते म्हणाले.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये जन्मलेले सुंदर पिचाई २०१५ साली जगातील गुगलचे सीईओ बनले. ते भारतीय वंशाचे पहिले नागरिक आहेत. गुगल मध्ये सर्वात मोठी जबाबदारी मिळाली. गुगलचे सह-संस्थापक लॉरी यांनी सुंदर पिचाई यांना गुगलचे सीईओ म्हणून घोषित केले. सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिक इंजिनियर होते पण आर्थिक दुर्बलतेमुळे ते त्यांना चांगले शिक्षण देऊ शकले नाहीत. सुंदर पिचाई यांनी १९९३ मध्ये आयआयटी खडगपूरमधून बीटेक केले. यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले. 

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *