Breaking News

गौप्यस्फोटानंतर ३ वेळा पत्रकार परिषद रद्द करून एनसीबीचे अखेर पत्रक जाहिर सैलने केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळले

मुंबई: प्रतिनिधी

आर्यन खान अंमली पदार्थ केसमधील एक पंच आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेला के.पी.गोसावी याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर सैल यांने आज एका व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे या प्रकरणी गौप्यस्फोट करत अनेक आरोप केले. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीची संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली. या गौप्यस्फोटानंतर जवळपास एनसीबीने दिवसभरात तीनवेळा पत्रकार परिषदांच्या वेळा जाहिर केल्या. मात्र दुपारनंतर या आरोपांचे खंडण करत असल्याचे एक पत्रक जाहिर केले.
या पत्रकान्वये एनसीबीने स्पष्ट केले की आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या न्यायालयाच्या समोर असून त्यावर सध्या सुणावनी सुरु आहे. तसेच या प्रकरणातील प्रभाकर सैल यांना जर काही म्हणणे मांडवयाचे होते तर त्यांनी सोशल मिडीयाच्याऐवजी न्यायालयात आपलं म्हणण मांडायला हवे असे स्पष्ट केले. याशिवाय प्रभाकर सैल यांनी काही व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर काही आरोप केले आहेत.

प्रभाकर सैल यांनी केलेले सर्व आरोप एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे ओळीने फेटाळत असल्याचे स्पष्ट करत त्याने केलेल्या काही आरोपांची चौकशी-तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञा पत्र एनसीबींच्या डायरेक्टरकडे पाठवून देत असून त्यावर योग्य ती कारवाई करावी असे पत्रकात नमूद केले.

आर्यन खान प्रकरणी हा नवा गौप्यस्फोट करण्यात आल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच एनसीबीने आतापर्यत केलेल्या सर्व कारवायांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या नव्या गौप्यस्फोटामुळे सोशल मिडियावर मात्र समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

एनसीबीने जाहिर केलेले हेच ते पत्रक:-

Check Also

एसटी विलिनीकरणाचा निकाल २२ डिसेंबरला, मात्र महामंडळ म्हणते अवघड अंतिम निकाल काय लागणार याबाबत एसटीबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता

मराठी ई-बातम्या टीम जवळपास महिन्याहून अधिक काळ एसटीच्या विलिनीकरणाच्या मुख्य प्रश्नावरून पुकारण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *