Breaking News

सदावर्ते म्हणाले, आमची लढाई विना दारू-मटण आणि पैशाची पण… एसटी बँकेच्या निवडणूकीत सदावर्तेंचे पॅनल उभारणार

एसटी विलनीकरणाच्या मागणीवरून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुकले. मात्र पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना १८ दिवसांचा पोलिस तुरूंगवास आणि गुन्हे महाराष्ट्र दौऱा केल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान देत एसटी महामंडळ कर्मचारी बँकेच्या निवडणूकीत आपले पॅनल उभारणार असल्याची घोषणा केली. तसेच आम्ही आमची लढाई ही विना दारू, विना मटण आणि विना पैशाची लढणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केलीय. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील कष्टकरी स्वतः स्वतःची माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉसकडून शेतातील बुजगावण्याप्रमाणे लोकं उभी केली जात होती अशी टीकाही केली.

राजकीय पुढाऱ्यांचे बुजगावणे कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण करतात. हेच बुजगावणे इतर राज्यांना ७-८ टक्के व्याजाने पैसे द्यायचे. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा मर्जीतील लोकांना दिला जायचा. इतर राज्यांना ७ टक्क्याने पैसे दिले जातात तर इकडे ७ टक्क्याने पैसे का दिले जात नाहीत असा सवालही केला.

आम्ही आमची लढाई विना दारू, विना मटण, विना पैशाची लढू आणि एसटी बँकेवर आमचा ध्वज फडकावतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Check Also

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं

हनुमान चालिसावरू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याप्रकरणी तब्बल १२ दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेले …

Leave a Reply

Your email address will not be published.