Breaking News

आर्यन खानप्रकरणी समीर वानखेडेंची केंद्रीय गृहखात्याकडून चौकशी कॉर्डिलिया क्रुजप्रकरणी मोठा निर्णय

कॉर्डिलीया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लिन चिट देण्यात आली. त्याच्या विरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. या प्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने दिली आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्याचा आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणचा संशयास्पद तपास आणि जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करणे या दोन्ही गोष्टींमुळे वानखेडे अडचणीत आले आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालायने घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी तोंडघशी पडली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरवातीला वानखेडे यांच्याकडे होता. तसेच, वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही झाला आहे. यामुळे वानखेडेंच्या मागे ही चौकशी आता लागली आहे.

समीर वानखेडे यांनीची क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून कारवाई करत आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. आर्यन खानला अडकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटलं होते. अखेर त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झालं आहे.

आर्यनला एनसीबीने क्लिनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. सॉरी, सॉरी म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मी आता एनसीबीमध्ये नाही. त्यामुळे या प्रकरणावर बोलू शकत नाही. यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, असे वानखेडे म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘एनसीबी’चे उपमहासंचालक संजय सिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांनी यासाठी तीन कारणे दिली आहेत. त्यानंतर आर्यन खानला क्लिनचिट देण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

  • सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.
  •  आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.
  • आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यन कान विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

 

 

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *