Breaking News

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींना गिफ्ट केली ‘ही’ महागडी गाडी दिवाळीच्या मुहूर्तावर नीता अंबानी यांच्या टायफात दाखल झाली

मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील सर्व महागड्या गाड्या आहेत अशातच आता मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे.

नीता अंबानींची ही नवीन कार लाल रंगाची आहे. नीता अंबानी यांना भेट दिलेल्या या SUV ची किंमत १० कोटी रुपये आहे. अंबानींच्या ताफ्यात अनेक कार आहेत. यामध्ये रोल्स रॉयस, बेंटले, लँड रोव्हर रेंज रोव्हर, कॅडिलॅक, टेस्ला, पोर्श, फेरारी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस, व्होल्वो आणि टोयोटा आदी कंपन्यांच्या कारचा सामावेश आहे.

रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील अंबानींच्या घराच्या गॅरेजमध्ये १५० हून अधिक वाहने आहेत. या लक्झरी एसयूव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीता अंबानी यांनी बुधवारी स्वदेश स्टोअरचे उद्घाटन केले आहे. या माध्यमातून देशातील हजारो कारागिरांना मदत करण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे रॉल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपे आधीपासूनच आहे. हिची किंमतही १३ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

मर्सिडीज मायबॅक बेन्ज एस६६० गार्ड देखील आहे. ही कार १० कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमतीची असल्याचे बोलले जाते. बीएमडब्ल्यू ७६० एलआय सिक्योरिटी (आर्मर्ड) आहे. हिची किंमत ८.५० कोटी रुपये एवढी सांगितली जाते. ही एक बुलेटप्रूफ कार आहे आणि सिक्योरिटीच्या दृष्टीनेही अत्यंत सुरक्षित आहे. फरारी एसएफ९० स्ट्रॅडेल देखील आहे. जी एक हायब्रिड स्पोर्ट्स कार आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या बेलापूर ते पेंधर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *