Breaking News

“त्या” महिलेचा अखेर मृत्यू, जबाबही घेता आला नाही मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत घडलेल्या प्रकरणाची आठवण करून देणारी घटना मुंबईतील साकिनाका येथे नुकतीच घडली. सदरची महिला इतकी गंभीर स्वरूपात जखमी झालेली होती की राजावाडी रूग्णालयात उपचारा दरम्यान तीची प्राणज्योत आज विझली. सदर महिला बेशुध्दावस्थेत असल्याने त्या महिलेचा जबाब नोंदविता आला नाही. मात्र पुढील तपास पूर्ण करून याप्रकरणातील आरोपी विरोधात चार्ज शीट न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही. ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉचमन याने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी हवालदाराने वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही दिली.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *