Breaking News

ठाकरे सरकारमधील हे मंत्री म्हणाले की, लोकल सगळ्यांसाठी लवकरच सुरू होणार दोन-तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरातील सर्वसामान्य चाकरमान्यांना आता लोकलसाठी फारकाळ वाट पहावी लागणार नसून आगामी दोन-तीन दिवसात यासंदर्भात निर्णय होणार असल्याची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयांचे वेळापत्रक आणि लोकांच्या कामाच्या वेळा याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हॉटेल इंडस्ट्री लवकर सुरु होते. तसेच इतरही क्षेत्र काही लवकर तर काही उशीरा सुरु होतात. त्या अनुषंगाने वेळेचे निश्चितीकरण आणि आणखी लोकल फेऱ्या वाढवून या सर्वांसाठी लोकल रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेवून याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकलने वकिलांना प्रवास करू देण्यासंदर्भात यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले असून इतरही सर्वसामान्य नागिरकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारला धोरण ठरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच नुकतेच महिलांना सकाळी ११ नंतर आणि संध्याकाळी ७ नंतर प्रवास करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरच प्रवास करण्याची परवानगी मिळेल अशी आशा लागू राहीली. मात्र मंत्र्यानीच यासंदर्भात संकेत दिल्याने मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

“त्या” नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालास कोण जबाबदार? सिध्दार्थ महाविद्यालय कि मुंबई विद्यापीठ

मुंबईः प्रतिनिधी एलएलबी विभागाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परिक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहिर केला. मात्र एलएलबीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *