Breaking News

मुंबईतल्या फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करणार मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी २०१४ मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल.
याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.

Check Also

MMRDA ची अर्थव्यवस्था धोक्यात ? कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन एमएमआरडीए ऑफिसर्स असोसिएशनचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी MMRDA ची आर्थिकस्थिती ढासळू लागल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सुरक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *