Breaking News

उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना काळात फी वाढ व सक्तीची फी वसुली करण्यास मनाई असताना सुद्धा अनेक शाळांनी अवाजवी फी वाढ करत सक्तीची फी वसुली चालवली आहे, तसेच वेळेत फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा प्रकार अनेक शाळांनी चालविला. याविरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे अतुल भातखळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी देत विभागीय शुल्क समितीच्या कामकाजाबद्दल आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्यावी,  वापरात नसलेल्या सुविधांची शुल्क आकारणी करू नये, पालकांसमोरील आर्थिक अडचणींचा विचार करता शुल्कवाढ करू नये, एकरकमी शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, वेळेत शुल्क न भरल्यास परीक्षेला किंवा ऑनलाइन क्लासमध्ये बसू न देण्याची धमकी देण्याचे प्रकार थांबवावे व या विरोधातील तक्रारीचा वेळेत निपटारा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शुल्क कायद्यानुसार कामकाज व्हावे या मागण्यांसाठी आ. अतुल भातखळकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

या संदर्भात पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार असून वरीष्ठ वकील बिरेंद्र सराफ हे भातखळकर यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आहेत.

Check Also

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *