Breaking News

लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी असून या शहराच्या वैभवात भर घलणारी एकतरी वास्तू किंवा गोष्ट असावी अशी भावना होती. त्यादृष्टीने लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून मुंबई आय वांद्रे-वरळी सी लिंकच्या जवळ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय सुरू करण्याबाबत यापूर्वी शिवसेनेकडून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. तसेच यासंदर्भात महापालिकेत सादरीकरणही करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून त्यास जवळपास मंजूरी देण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
लंडन आय आहे काय?
इंग्लड मधील लंडन या शहरात थेम्स नदीच्या किनारी सर्वात उंच आणि मोठा पाळणा असून या पाळण्यातून संबध लंडनला पाहता येते. तसेच या पाळण्याची उंची सर्वाधिक असून पर्यटकांना नेहमीच या लंडन आयचे आकर्षण आहे. लंडनला गेलेला पर्यटक एकदा तरी याचा आनंद लुटतो.
मुंबई शहरालाही आकाशातून अर्थात उंचावरून कसा दिसतो याचे आकर्षण मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला आहे. परंतु शहरात असे एखादे कोणतेच ठिकाण नाही की ज्या ठिकाणाहून संपूर्ण मुंबई दिसेल. मात्र आता मुंबई आय मुळे मुंबईकरांबरोबरच पर्यटकांनाही संपूर्ण मुंबई पाहता येणार आहे.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *