Breaking News

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील तीघांचे जाणून घ्या प्लस आणि मायनस पॉंईट पण सोनिया गांधींचा निर्णयच ठरणार अंतिम

मुंबई: प्रतिनिधी

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसला सुगीचे दिवस आणि स्वत:चे राजकारणातील भक्कम स्थान करण्यासाठी अडगळीत पडलेल्या आणि क्षमता असूनही नेतृत्वाची संधी न मिळालेल्या मुंबईतील काँग्रेस नेत्यांकडून आता काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे जॅक लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कितीही जॅक लावण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या कोणाच्या नावाला पसंती देणार त्यावरच मुंबईचा अध्यक्ष ठरणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मुंबईच्या अध्यक्षपदासाठी गुरूवारी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाने पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विश्वासू नेत्यांची भेट घेवून सर्व परिस्थितीची माहिती दिली. तसेच अंतिम यादीतील डॉ.अमरजितसिंह मनहास, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची यादी सादर यादी व त्यांच्या आतापर्यतच्या कामाची आणि पक्षनिष्ठतेची सविस्तर माहिती सोबत जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अंतिम यादीतील भाई जगताप

सकारात्मक बाजू-  हे मागील अनेक वर्षापासून कामगार क्षेत्रात काम करत असून त्यांच्या अनेक कामांची आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटनांशीही त्यांचे चांगले संबध आहेत. राज्यात काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी ते सातत्याने विविध दूरचित्रवाहीनीवरील चर्चा, परिसंवाद आणि वाद-विवादात सहभागी होत मांडतात. त्यामुळे त्यांची काँग्रेसचे खंदे स्पष्टवक्ते प्रवक्ते अशी प्रतिमा राजकारणात निर्माण झाली आहे.

नकारात्मक बाजू-परंतु त्यांचा लोकसंपर्क हा अत्यंत मर्यादीत स्वरूपात असल्याने निवडणूकांमध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. तसेच जनसंपर्क सातत्याने वाढवत नेवून तो टिकवून ठेवण्यात ते अपयशी असल्याची नकारात्मक बाजू त्यांच्याच पक्षात आहे.

सुरेश शेट्टी-

सकारात्मक बाजू– शेट्टी हे अशोक चव्हाण, स्व.विलासराव देशमुख यांच्या काळात मंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. आरोग्य मंत्री म्हणून काम केलेले असल्याने आरोग्य विभागाची त्यांना जाण आहे. तसेच माजी खासदार प्रिया दत्त यांचे निष्ठावान सहकारी म्हणून पक्षात ओळख आहे.

नकारात्मक बाजू-मतदारसंघापूरते मर्यादीत असल्याची प्रतिमा पक्षात आहे. तसेच व्यक्तीमत्व प्रभावी पध्दतीचे असले तरी ते मर्यादीत स्वरूपाचे असल्याने त्यांच्या आक्रमक पणाबद्दल नेहमीच शंका उपस्थित केली जाते.

डॉ.अमरजितसिंह मनहास-

सकारात्मक बाजू- मागील ३० वर्षाहून अधिक काळ मुंबई विद्यापीठाचे सिनेट म्हणून निवडूण जात होते. तसेच मुंबई विद्यापीठ म्हटले की डॉ.अमरजितसिंह मनहास अशी एक स्वत:ची ओळख मुंबईत आहे. तसेच ते स्वत: उच्चविद्या विभूषित आहेत. त्याशिवाय मुंबई प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या बाले किल्ल्यासह मुंबईतील इतर भागातही चांगला जनसंपर्क आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे ते अध्यक्ष होते. मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध होण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने निर्णय घेतला होता. स्व.गुरूदास कामत यांचे निष्ठावन सहकारी म्हणून पक्षात आणि मुंबईत प्रतिमा. कामत यांच्यासारखे प्रसिध्दीच्या झोतात न राहता आपल्याला हवे असलेले ईस्पित साध्य करणे आणि रिझल्ट ओरियंटेड काम करणे. वेळप्रसंगी आक्रमकपणे बाजू मांडणे. डॅमेज कंट्रोलसाठी प्रसिध्द.

नकारात्मक बाजू- पडद्यामागे राहून सतत काम करणे. प्रसिध्दीच्या झोतात न राहणे.

Check Also

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या गोष्टी गरज तर आदित्यनी सांगितले उभारणार वांद्रे उड्डाणपुल मार्गिकेच्या उद्घाटन प्रसंगी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *