मुंबई

आयएएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे पत्र वेळेत हजर रहा आणि विधिमंडळात बसत जा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी पासून सुरु झाले. मात्र त्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसातच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयएएस अधिकारी एम के सिंग यांना अचानक एका विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहितीचे ब्रिफींग घेण्यासाठी विधिमंडळातील मंत्री कार्यालयात पाचारण करण्यात आले. सदर अधिकाऱ्यांस जवळपास चार ते पाच वेळा बोलवणे धाडूनही …

Read More »

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “वाहे गुरु” व “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळा संपन्न

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा बेताल व उद्धट पोलिस निरिक्षकांवर योग्य ती कारवाईची केली मागणी

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता पोलीस प्रशासनातील अधिकारीही दादागिरी करत आहे. पोलीस लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. धारावीतील शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांनी खासदाराशी व रहिवाशांशी उद्धट वर्तणूक करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अशा …

Read More »

मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकालगतच्या पुलाचे नामकरण राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आश्वासन

विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने  गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार …

Read More »

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण १०० आणि ११२ या हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीवर पोहोचता यावे यासाठी घेतल्या गाड्या

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, बीएमसीच्या ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही ‘अर्थ’ नाही व ‘संकल्प’ही नाही बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार

मुंबई महानगरपालिकेच्या ८० हजार ९५२ कोटींच्या अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही व कोणताही संकल्प नाही असा अर्थहिन अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी जमा केलेल्या होत्या, त्या ठेवी मोडून बीएमसीला दिवाळखोरीत ढकलण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात केला असून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या कार्यक्रमात व्यक्त केले मत

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशिप फोरम २०२६च्या चर्चासत्रात पत्रकार विष्णु सोम यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आपले …

Read More »

दादर येथे भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपाच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजपा कार्यालयासमोर फुले उधळून निषेध …

Read More »

पैलवान महेश घुले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ७२ वजनी गटातील कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड

अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कामगार कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी केंद्र व राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राज्य – राष्ट्रीय पातळीवर विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय नागरीसेवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने यावर्षी राष्ट्रीय कुस्ती …

Read More »