Breaking News

मराठा आंदोलन: मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकास १५ जूनपर्यंत हजर करून घ्या एसटी महामंडळाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ८१ हून अधिक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. अशा मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी.माहामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही कार्यवाही १५ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्व एसटी डेपोंना एसटी महामंडळाने दिल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्यावतीने मोर्चे काढण्यात आले. मात्र त्यावर तातडीने राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने अनेक युवकांनी आणि युवतींनी आत्महत्या करत राज्य सरकारला वास्तवाची जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर मराठा आरक्षणासाठी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एस.टी महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार धोरण तयार करण्यात आले असून १५ जून पर्यंत त्या व्यक्तींच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्ह्याच्या एस.टी.डेपो व्यवस्थापकांना आज देण्यात आले.

यासंदर्भातील एक पत्रक एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापकांच्या सहीने परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व डेपो व्यवस्थापकांना पाठविण्यात आले आहे. याशिवाय सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कर्मचाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्या ३१ मे २०२१ रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजात निर्माण झालेली रोष काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

Check Also

मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून? वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवर फाळणीच्या दु:खाची आठवण मात्र पीएमओच्या खात्यावर नाही

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *