Breaking News

MPSC कडून या पदांकरीता जाहिरात प्रकाशितः जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा २९० पदांसाठी जाहिरात २ जानेवारीला होणार परिक्षा

मुंबईः प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाने जाहिर केल्याप्रमाणे २०२१ मधील पहिली शासकीय पदांसाठीची जाहिरात आज प्रसिध्द करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची तारीख २५ ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे. आज प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधिक्षक-सहायक पोलिस उपायुक्त, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी व तत्सम पदे, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, उद्योग उपसंचालक पद, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे-महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब., कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व तत्सम पदे, सहायक निंबधक सहकारी संस्था, उपअधिक्षक भूमि अभिलेख, उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी आदीं पदांकरीता परिक्षा एमपीएससीकडून घेण्यात येणार आहे.
अर्ज भरण्याची प्रक्रिया आज ४ ऑक्टोंबकरपासून ते २५ तारखेपर्यंत राहणार आहे. तर परिक्षेसंदर्भात तारीख २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. तर मुख्य परिक्षेतीची तारीख मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

एमपीएससीकडून प्रकाशित करण्यात आलेली हीच ती जाहिरात..

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *