Breaking News

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परिक्षा आठ दिवसांमध्ये होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ व्यांदा एमपीएससी परिक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिवसभर केलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने दखल घेत या परिक्षेची नवी तारीख उद्या जाहिर करण्यात येणार असून हि तारीख ८ दिवसातील असणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना आज रात्री दिले.

विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

एमपीएससीची परिक्षा नियोजित परिक्षा १४ मार्चला होणार होती. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हि परिक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससी आयोगाने घेत तशी माहिती आज सर्व विद्यार्थ्यांना कळविली. मात्र विद्यार्थ्यांनी पाचव्यांदा परिक्षा पुढे ढकलल्याने आंदोलनाची भूमिका स्विकारत दिवसभर आंदोलन करण्यास सुरुवात केली.

हि परिक्षा लवकरच घेतली जाणार आहे. उद्या आयोगाकडून यासंदर्भात अधिकृत अंतिम परिक्षेची तारीख जाहिर करण्यात येणार आहे. ही तारीख १४ तारखेपासून ८ दिवसातील असणार असल्याचे आश्वासन दिले. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिक्षेसाठी लागणारा सर्व कर्मचारी वर्ग कोरोनाच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. परंतु पुढील आठ दिवसात परिक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच परिक्षेला उशीर होत असल्याने वय उलटून जाण्याची भीती वाटत असेल तर त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण परिक्षेला ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले आहेत. त्या सर्वांना परिक्षा देता येणार असून या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाची वयाची अट राहणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पूर्वीही त्यावर औषध नाही ना आजही नाही. जगातील अनेक देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. महिना दोन महिने झाले तरी तेथील लॉकडाऊन उठविण्यात आलेला नाही. महाराष्ट्रतही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे पण मला राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची बिलकूल इच्छा नाही. परंतु नागरिकांनी त्रिसुत्री वापरावी आणि कोरोनाची चाचणी सर्वांनी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांची परिक्षा १४ मार्चलाच घ्यावी अशी मागणी करत आपले आंदोलन असेच पुढे सुरु राहणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *