Breaking News

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे आता हे इंजेक्शन बाधित रूग्णांसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी किंमतीवर कॅप लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे आता रेमडेसिवीर स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नव्या दरानुसार कॅडिला हेल्थकेअरच्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शन यापूर्वी २ हजार ८०० ला मिळायचे आता ते ८९९ रूपयांना उपलब्ध होणार. सिनेजेने इंटरनॅशनल लि. (बायोकॉन बायोलॉक्स इंडिया) चे इंजेक्शन यापूर्वी ३ हजार ९५० रूपयांना होते आता ते २ हजार ४५० रूपयांना मिळणार आहे. डॉ.रेड्डी लॅबोरेटरीजच्या इंजेक्शनची किंमत यापूर्वी ५ हजार ४०० रूपयांना मिळत होते आता ते २ हजार ७०० रूपयांना मिळणार आहे.

सिप्ला लिमिटेडच्या इजेक्शनची किंमत ४००० रूपये होती आता हे ३ हजारांना उपलब्ध होणार आहे. मायलॅन फार्म्युसिटीकल्स प्रा.लि. चे इंजेक्शन ४ हजार ८०० रूपयांना होते आता ते ३ हजार ४०० रूपयांना उपलब्ध होणार. ज्युबिलियन्ट जेनरीक लि.चे इंजेक्शन ४ हजार ७०० रूपयांना होते आता ते ३ हजार ४०० रूपयांना उपलब्ध होणार असून हेटेरो हेल्थकेअरचे इंजेक्शनही यापूर्वी ५ हजार ४०० रूपयांना मिळत होते आता ते  ३ हजार ४९० रूपयांना बाजारात उपलब्ध होईल.

या सात कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दरात कपात केल्याने रूग्णांना आता कमी किंमतीत इंजेक्शन उपलब्ध होतील.

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *