Breaking News

एमएमआरडीएचे १६ हजार कोटी मुंबई महापालिकेने थकविले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

एमएमआरडीच्या माध्यमातून मुंबईत अनेक प्रकल्प राबविले जातात. भांडवली खर्चापैकी १६ हजार ६६४ कोटी एवढी रक्कम मुंबई महानगरपालिकेकडून एमएमआरडीएला येणे अपेक्षित आहे. या रकमेतून झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत एमएमआरडीएकडून ८८.७५ कोटी रक्कम मुंबई महानगर पालिकेला येणे अपेक्षित असल्याने ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यासाठी प्राधिकरणाने विनंती केली आहे. ही थकित रक्कम देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

विधानसभेत भाजपा सदस्य संजय पोतनिस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा शुल्कापोटी जमा होणाऱ्या रकमेबाबत प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री शिंदे बोलत होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प निधी अभावी अपूर्ण राहणार नाहीत. मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमांतून प्रकल्प राबविले जातात त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असूनया कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देय असलेली रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहरात एसआरए, मेट्रोएमएसआरडीसीमोनोएमएमआरडीए अशी विविध आठ प्राधिकरणे काम करीत आहेत. शासनाच्या अंतर्गत असलेले हे प्राधिकरण असूनलोकांना पायाभुत सुविधा मिळावयाला हव्यात यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी या विविध प्राधिकरणांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कामास गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलारभास्कर जाधवरविंद्र वायकरयोगेश सागरप्रताप सरनाईक यांनी भाग घेतला होता.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *