Breaking News

भाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी
राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार एखादा राजकिय व्यक्ती एका सभागृहाचा सदस्य असेल आणि निवडणूकीत तो पुन्हा विजयी होवून दुसऱ्या एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडूण आला असेल तर दोन्हीपैकी एका सभागृह सदस्यत्वाचा सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा आणि एकाच सभागृहातील सदस्यत्वाचे मानधन घ्यावे. मात्र या तरतूदीचा विसर भाजपा, शिवसेना आणि समाजवादी पार्टीच्या आमदारांना पडला असल्याचे दिसून येत असून आमदार झाल्यानंतरही नगरसेवक पदासाठीचे मानधऩही मुंबई महापालिकेकडून घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार बनल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे. परंतु आमदार बनलेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक पालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहे त्याची माहिती देताना नाव, वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी. चिटणीस खात्याने अनिल गलगली यांस कळविले की खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. २५०००/- मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. १५०/- भत्त्यासाठी अश्या केवळ चार सभांकरिता दिले जाते.
अनिल गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे त्या ठिकाणी राजीनामे घेणे आवश्यक होते पण दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अश्या परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते.

Check Also

लोकल प्रवासासाठी लसप्रमाणपत्राची पडताळणी करायचीय, मग या सोप्या गोष्टी करा मुंबई महापालिकेने कडून १०९ स्थानकांवर केली ऑफलाईन तपासणी सुविधा

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *