Breaking News

सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह या व्यक्तींना आता दोन्ही आमदार निवास बंद विधिमंडळ सचिवांकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

स्थानिक पातळीवर कामे मार्गी लागत नाहीत म्हणून मंत्रालयातील येवून कामे मार्गी लावण्यासाठी आणि दुर्धर आजारावरील उपचारासाठी राज्यभरातून मुंबईत येणाऱ्यांचे हक्काचे ठिकाण म्हणजे मंत्रालयाच्या जवळील आमदार निवास. परंतु आता मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध आमदारांचे कार्यकर्त्ये, कामानिमित्त येणारे नागरीक, उपचारासाठी रूग्ण या सर्वांसाठी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवास, विस्तारीत आमदार निवास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेशही जारी करण्यात आले.

आकाशवाणी आमदार निवास आणि विस्तारीत आमदार निवासात फक्त विधान परिषद, विधानसभेचे आमदार आणि त्यांचे कुंटुबिय व स्वीय सहाय्यकांनाच आता प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विविध कामासाठी येणारे कार्यकर्त्ये, रूग्ण आणि पक्ष कार्यालयात नेत्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना आता निवासाची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

विधिमंडळ सचिवांच्या या आदेशाने काही काळापुरते या सर्वांना आमदार निवास बंद होणार असल्याने राज्य भरातून एक प्रकारे मुंबईत विशेषत: मंत्रालयात येणाऱ्यांना एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या मुंबई प्रवेश बंदीला सामोरे जावे लागणार आहे. या आमदार निवासातील मोफत राहण्याच्या भरोश्यावरच राज्यातील अनेक नागरीक मुंबईत येतात. आता हे आमदार निवासच बंद झाले आहे.

मात्र हे आमदार निवास बंद झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांना आणि मंत्रालया व्यतिरिक्त इतर कामासाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच त्यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजाही पडणार आहे. दरम्यान आमदार निवासात फक्त आमदार आणि त्यांचे कुटुंबिय आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकालाच प्रवेश मिळणार आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावावर ज्यावेळी नियंत्रण येईल त्यावेळी आमदार निवास प्रवेशावर लागू करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यत आमदारांचे कार्यकर्त्ये, कामासाठी येणारे आणि रूग्णांना वाट पहावी लागणार आहे.

 

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *