Breaking News

राज्यातील नौकाविहार, पर्यटनस्थळे नागरीकांसाठी झाले खुले राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शहरांमध्ये असलेले तलाव, नौकानयनासाठी असलेले प्रसिध्द असलेली ठिकाणी नौकानयन पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी आज दिली. त्याचबरोबर पर्यटनस्थळेही खुली करण्यास परवानगी देण्यात आली असून ही सर्व स्थळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या असलेल्या नियम व अटींची पालन करून या गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून अनलॉक आणि MissionBeginAgain अंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नौकानवन स्पर्धा आणि नौका विहार करण्याचा आनंद नागरीकांना लुटता येणार आहे. त्याचबरोबर पर्यटनस्थळे सुरु करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडून स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क, करमणूकीची मैदाने आदी गोष्टीही सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटन विभागाकडून, पोर्ट विभागाकडून आणि केंद्र सरकारने यापूर्वी जारी केलेल्या स्वतंत्र नियमावली जारी करण्यात आलेली असून त्यानुसार या गोष्टी सुरु होतील असे सरकारकडून सांगण्यात आले.

Check Also

कोविडला नैसर्गिक आपत्ती जाहिर करा, कर्ज हप्ते वसुली करू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *