Breaking News

हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्टला ५ ऑक्टोंबरपासून परवानगी पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत डब्बेवाले, सर्व उद्योगांना परवानगी राज्य सरकारकडून मिशन बिगेन अंतर्गत आणखी नव्या सवलती

मुंबई: प्रतिनिधी

मिशन बिगेन अगेन-६ अंतर्गत राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरु करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्टोंबरपासून परवानगी देत डब्बेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व लहान-मोठ्या उद्योग (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ् सर्व गोष्टी  सुरु करण्यास परावनगी दिली. त्याचबरोबर मुंबई-पुणे दरम्यान असलेले रेल्वे सेवा पुन्हा पुर्ववत करण्यात आली असल्याने या मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असून हॉटेल-रेस्टॉरंट- फूड कोर्ट चालकांबरोबर डब्बवाले, उद्योजक आणि कामगारांना यांनाही दिलासा मिळाला.

याशिवाय राज्यांतर्गंत असलेली रेल्वे सेवा उद्यापासून लगेच पूर्ववत करण्यास परवानगी देण्यात आली. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी जारी करण्यात आली असून यापुढेही जारी होणार आहेत. त्याचबरोबर एमएमआर अर्थात मुंबई महानगर प्रदेशात लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे येथील लोकल रेल्वे सेवाही मुंबई ,लोकलच्या धर्तीवर पूर्ववत अर्थात किमान व्यक्तींना परवानगी देत सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य सरकारने याचबरोबर लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑक्टोंबरपर्यत वाढविला आहे.

 

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *