Breaking News

राज्य अल्पसंख्याक आयोग तुमच्या दारी अध्यक्ष हाजी अरफात शेख जाणून घेणार समस्या

मुंबई : प्रतिनिधी

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याकांच्या विविध समस्या ऐकण्यासाठी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी ‘आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्याची पहिली सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून झाली. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हा दौरा करून अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

सोमवार दिनांक ३ डिसेंबर पासून मराठवाड्याच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद पासून होत असून यात ३ डिसेंबर औरंगाबाद, ४ डिसेंबर बीड, ५ डिसेंबर लातूर तर ६ डिसेंबर ला उस्मानाबाद येथे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख शासकीय विश्रामगृह येथे अल्पसंख्याक समाजातील जैन, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, शीख, पारसी समाजाच्या समस्या ऐकून घेतील आणि दुपारी अडीच वाजता जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात संबधीत अधिकाऱ्यानं समवेत बैठक घेतील. त्यानंतर ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन याची माहिती पत्रकारांना दिली जाईल.

दीर्घकाळ आयोगाचे अध्यक्षपद रिक्त राहिल्यानंतर हाजी अरफात शेख यांची या पदावर सरकारने नियुक्ती केली.या नियुक्तीनंतरचा हा अशाप्रकारचा पहिला वहिला दौरा असून या दौऱ्यात दुसऱ्या टप्यात विदर्भ , उत्तर महाराष्ट्र आणि कोकणचा दौरा देखील आयोजित केला जाईल दौऱ्या दरम्यान जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे अल्पसंख्यानक समाजाच्या समस्यां समजून घेतल्या जातील आणि त्याचे निवारणसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील.

अल्पसंख्याक (जैन,शीख,बौद्ध,ख्रिशचन,मुस्लिम) समाजाला भरवसा देण्यासाठी की हेच सरकार आपलं आहे आणि हेच सरकार आपल्या पाठी खंबीरपणे उभे आहे याची जाणीव करून देणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश्य असेल. फक्त एवढ्यावरच थांबून जमणार नसल्याची जाणीव असल्याने यापुढे देखील अल्पसंख्याकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक, ट्विटर, हेल्पलाईन या सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणार असल्याचे हाजी अरफात शेख यांनी सांगितले आहे.

Check Also

शिशू वर्ग ते १२ वी पर्यंतच्या ८५% पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता 'लीड स्कूल' सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई : प्रतिनिधी सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *