Breaking News

राज्य मंत्रिमंडळातील भाच्याची मागणी मामाने केली मान्य, पण भाच्याने घेतला पॉज प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी

अहमदनगर-राहुरी: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात सर्वपक्षांमध्ये काका-पुतणे, मामा-भाचे असे नातेवाईक चांगलेच सक्रीय आहेत. मात्र मंत्रिमंडळात एकाचवेळी मामा-भाचे असलेले आणि या मामा-भाच्यांनी आपापल्या मतदारसंघ आणि विभागाशी संबधित मागण्या एकाच मंचावरून एकमेकांकडे केल्याची घटना तशी दुर्मिळच. पण अशी घटना घडली ती ही आजच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राहुरीत आले होते. तेव्हा येथे असलेले जयंत पाटील यांचे भाचे तथा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे या कार्यक्रमात सहभागी झाले. संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात मात्र या दोघा मामा-भाच्यांनी एकमेकांकडे आपल्या विभागाशी आणि मतदारसंघाशी निगडीत मागण्या केल्या. मात्र भाच्याने केलेली मागणी मामा असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ मान्य केली. मात्र मामाने भाचा प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेली मागणीवर मात्र तात्काळ होकार कळविला नाही.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ आज राहुरी येथे पोहोचली. पक्षाची आढावा बैठक घेत असताना मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चांगलीच विकासात्मक बाबींवर जुगलबंदी उपस्थितांना पहायला मिळाली.

मतदारसंघाचा आढावा देत असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमुळे विस्थापित झालेल्या गावांना दळणवळणासाठी पुलाची मागणी केली. याबाबत आधीच निर्णय झाला असून या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग ५०-५० टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. यावेळी निळवंडे धरणाच्या कामाच्या प्रगतीची माहिती जयंत पाटील यांनी उपस्थितांना दिली तसेच २०२४ पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल असेही त्यांनी आश्वासित केले. तनपुरे यांनी भागडा चारी प्रकल्प व इतर योजनांबाबतही आपली कैफियत मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडली.

त्यावर मामा असलेल्या जयंत पाटील यांनी राज्यमंत्री तनपुरे यांना म्हणाले, तुमच्या मागण्या मान्य केल्या आता आमच्या निधीचाही विचार करा असे सांगत प्राजक्तदादा माझंही तुमच्याकडे काम आहे… तुमच्या मागण्या मान्य केल्या आता आमच्या निधीचाही विचार करा असे म्हणत जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांना गुगली टाकली. आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राहुरी मतदारसंघात जवळपास २०० ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. आमच्या भागाकडेही लक्ष असूद्या अशी कोपरखळीही मारली.

Check Also

सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशामुळे अजित पवारांची अडचण होणार ? पेट्रोल-डिझेलचा जीएसटी करात समाविष्ट करण्याचे या आधीच राज्य सरकारचे पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशातील नागरीकांना स्वत: दरात पेट्रोल-डिझेल देण्यासाठी या दोन्ही वस्तुंचा समावेश जीएसटीत करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *