Breaking News

२४ वर्षानंतर शिवउद्योग सेनेच्या मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिली करमाफी विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी 

साधारणत: २४ वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना नवतरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जगविख्यात पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याच्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक कर भरावा लागला. मात्र तो भरलेला कर पुन्हा सदर कंपनीला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.

विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

मुंबई उच्च न्यायालयाने १३ एप्रिल २०११ रोजी या संदर्भात आदेश दिला होता.  त्या अनुषंगाने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील कलम ६ (३) मधील तरतुदींनुसार कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्काच्या आकारणीतून सूट देण्याचा अधिकार शासनास आहे.

त्याप्रमाणे मे. विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि., मुंबई या संस्थेद्वारे मुंबई येथे १ नोव्हेंबर, १९९६ रोजी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सन या पाश्चात्य संगीतकाराच्या “पॉप शो” या सदरातील पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमास फेरविचारांती करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *