Breaking News

अर्धा टक्काही आरक्षण कमी केले जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नागपूर : प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण शिक्षणामध्ये कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कपात केलेली नाही. मात्र तसे जर वाटत असले तर ओबीसींचे पूर्ण आरक्षण त्यांच्यासाठी देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्वाही दिली.

प्रवेशामध्ये ७०-३० चा फॉर्म्युला असतानाही त्यात बदल केला जात असल्याचा आरोप सावंत आणि राजेश टोपे यांनी केला.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यातील कोणत्याही आरक्षणात घट करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले.

यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हरकत घेत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉसलेजची संख्या कमी आहे. त्यामुळे या मराठवाड्यातील मुलांवर अन्याय होण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांनावर अन्याय होवू नये यासाठी सध्याच्या फॉर्म्युला तयार करण्याबाबत लवकरच बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *