Breaking News

शिक्षकांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने ही अट काढून टाकली रेशनकार्डची अट नसल्याबाबत शिक्षण विभागाचा खुलासा - शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई : प्रतिनिधी

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सुरुवातीला शिक्षण विभागाने रेशन कार्ड असण्याची अट शिक्षकांना बंधनकारक केले. मात्र याप्रश्नी शिक्षक भारती संघटनेने पाठपुरावा सातत्याने करून रेशनकार्डची अट काढून टाकण्यास राज्य सरकारला बाध्य केले. त्यानुसार अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सदरची अट काढून टाकण्याचे आदेश दिल्याने अखेर शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपुर्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

मंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाकडून एक पत्रक काढून प्रतिपुर्तीच्या कागदपत्रांमधील रेशन कार्डाची अट काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले. याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र दिलं होतं. अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची बिलं नाकारली जात होती. रेशनकार्डात नाव असल्याची अट टाकली जात असल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रेशनकार्डची अट नाही  याबाबत शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त, सर्व विभागीय उपसंचालक आणि सर्व प्राथमिक / माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनाही कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *