Breaking News

महसूल मंत्री थोरातांच्या आदेशाने झालेल्या उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्याच बेकायदा नागपूर मॅट कोर्टाने ४० जणांच्या बदल्या बेकायदेशीर ठरविल्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी

लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर निर्बंध घातलेले असतानाही महसूल विभागाने राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर  “गुच्छ”चे आदान प्रदान झाल्याची चर्चा त्यावेळी महसूल विभागात रंगली होती. विशेष म्हणजे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याने नागपूरच्या मॅट कोर्टाने त्यांच्याही कार्य पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे केल्याची बाब मराठी ई-बातम्या.कॉमला उपलब्ध झालेल्या निकालपत्रात आढळून आली.

महसूल मंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या या बदल्यांच्या विरोधात नागपूर विभागातील ४ उपजिल्हाधिकारी आणि ८ तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यावर निकाला देताना कोर्टाने वरील आदेश दिले.

नागपूरच्या मॅट कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागपूर महसूली विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या केलेल्या बदल्या या बेकायदेशीर आहेत. या  बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळाने तयार केलेल्या यादीनुसार नाहीत. तसेच या बदल्या करू नयेत असे स्पष्टपणे नागरी सेवा मंडळाने महसूल विभागाला कळविले होते. तरीही या बदल्यांबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेत केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच ज्या ४० उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. त्या सर्वांचा नियुक्त पदावरील कालावधी पूर्ण झालेला नव्हता. तरीही मुदती पूर्वीच या बदल्या करण्यात आल्याने या सर्व बदल्या बेकायदा ठरत असून बदल्या करण्यात आलेल्यांना पुन्हा मुळ जागेवर रूजू होण्याबाबतचे आदेश कोर्टाने दिले.

महसूल मंत्र्यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरोधात सध्या मुंबईत १५ याचिका आणि औरंगाबादेत १५ तेथील मॅट कोर्टात अद्याप प्रलंबित आहेत. त्या याचिकांमध्येही असाच निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपूर्ण कार्यपध्दती बद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बदल्यांसदर्भात यापूर्वीच मराठी ई-बातम्या.कॉम (www.marathiebatmya.com) ने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर “गुच्छ” ची देवाण घेवाण झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यासाठी महसूल विभागातील एक उपसचिव फारच सक्रिय असल्याचे सांगण्यात येत होते. या “गुच्छ” पध्दतीत पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांची कालवधी पूर्ण होण्या अगोदरच बदली करण्यात आली होती. मात्र सततच्या राजकिय दबावामुळे त्यांना मानसिक त्रास वाढला आणि त्यातच त्यांना हार्ट अॅटक येवून मृत्यू झाल्याची चर्चाही त्यावेळी महसूल विभागात रंगली. याबाबतचे वृत्तही याच संकेतस्थळाने प्रसिध्द केले होते.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *