Breaking News

तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी राहणाऱ्यांचा ‘घाट’ अभिनेता उमेश आणि अभिनेत्री मिताली पहिल्यांदाच एकत्र

मुंबई:प्रतिनिधी

अभिनेता उमेश जगताप व अभिनेत्री मिताली जगताप यांनी रंगभूमी,  मालिका, रुपेरी पडदा अशा विविध माध्यमातून सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सर्वच माध्यमांवर अधिराज्य गाजवणारे असे कलाकार जेव्हा प्रथमच एकत्र येतात, तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. आतापर्यंत मोजक्या पण हटके भूमिका करणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार आगामी ‘घाट’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र झळकणार आहेत. जरे एंटरटेन्मेंट ची प्रस्तुती असलेल्या ‘घाट’ चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन जरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राज गोरडे यांनी केलं आहे.

उमेश यांनी यात ‘जग्गू’ तर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मिताली ने ‘विमल’ ही व्यक्तीरेखा यात साकरली आहे. ‘घाट’मध्ये प्रेक्षकांना उमेशचं अत्यंत वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. याबाबत उमेश म्हणाले की, या चित्रपटातील माझी भूमिका काहीशी निगेटिव्ह आहे. घाटावर वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबातील बेफिकीर बापाची भूमिका मी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मितालीसारख्या प्रतिभावान अभिनेत्रीसोबत प्रथमच काम करण्याची संधी लाभली. सोशिक बायको, मुलाच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी धडपडणारी आई यात मितालीने साकरली असून या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. जे माझ्यातील कलाकार घडवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण असल्याचे अभिनेत्री मिताली जगताप यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव चित्रपटाच्या चौकटीमध्ये मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राज गोरडे यांनी केला आहे.‘घाट’च्या निमित्ताने प्रेक्षकांना वास्तववादी कथानक आणि लोकेशन्सचा अनोखा संगम पाहायला मिळेल.  चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राज गोरडे यांनी लिहिले आहेत. उमेश आणि मिताली यश कुलकर्णी व दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांच्या तसेच रिया गवळी यांच्याही ‘घाट’ मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. १५ डिसेंबरला ‘घाट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *