Breaking News

जेष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: प्रतिनिधी

एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय ७५) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (१७ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात  आले.

ललिता देसाई यांचा जन्म २१ जानेवारी १९४५ रोजी झाला. ‘कामापुरता मामा’ या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. मात्र आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात त्यांनी रंगवलेल्या बोल्ड अशा किशोरी या व्यक्तिरेखेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.  त्यानंतर ‘गुंतता हदय हे’, ‘नाथ हा माझा’, ‘अपराध मीच  केला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘अभिलाषा’, ‘मॅडम’  या नाटकांतून त्यांनी काम केले.

मराठी रंगभूमी व  चित्रपटांबरोबरच त्यांनी ‘कब, क्यों और कहा’, ‘अमर प्रेम’, ‘संतान’, ‘सीता और गीता’, ‘अनुराग’, ‘यादो की बारात’ या हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या.  रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Check Also

गोड गळ्याचे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच कोरोनामुळे निधन वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चेन्नई : प्रतिनिधी तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *