Breaking News

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा रणकंदन विधान परिषदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी

नागपुर : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषेदत सर्व पक्षिय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर याप्रश्नावर मंत्रीमंडळाची उपसमिती चर्चा करीत असते. त्या समितीला मार्गदर्शन करण्यासाठी सदस्यांनी त्या चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. याप्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज एकदा तहकूब करावे लागले.

कॉग्रेस सदस्य शरद रणपिसे यांच्यासह जवळपास २७ सदस्यांनी विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला.

तीन वर्षापेक्षाही जास्त काळ हा प्रश्न रेंगलेला आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले. महामोर्चाही काढण्यात आले. तेव्हा शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन सरकारने पाळलेले नसल्याचा आरोप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी करत किती जिल्ह्यात वसतीगृहासाठी जागा दिल्या, ५ कोटी निधी देणार होते. त्याचं काय झाले, आणि आता किती दिवसात आरक्षण देणार का ? अधिवेशन संपण्यापुर्वी निर्णय घेणार का? अशी प्रश्नांची सरबतीही त्यांनी राज्य सरकारवर केली.

त्यावर उत्तर देताना सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, प्रश्न संवेदनशील आहे. तो अधिक चिघळू नये. यासाठी हा प्रश्न मागास आयोगाकडे सोपविण्यात आलेला आहे. आयोगाची एक बैठकही झालेली आहे. मात्र ही बाब न्याय प्रविष्ठ असल्याने त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही.

त्यावर भाई जगताप यांनी हरकत घेत, मराठा मुलांच्या वसतीगृहाकरीता किती जिल्ह्यात जागा दिल्या? त्यावर मंत्री पाटील म्हणाले की, वसतीगृह उभारणीसासाठी संस्थानी पुढाकार घेतला पाहीजे, मात्र त्या येत नाहीत. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरीता अनुक्रमे ५० हजार आणि ४० हजार रूपये भाडे द्यायची तयारी सरकारची आहे. ३६ जिल्यात प्रस्ताव येतील त्या प्रमाणे दिड महिन्यात जागा उपलब्ध करून देण्यात येतील. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून १० लाख तसेच संस्था किंवा मंडळाकरीता ५० लाखापर्यंतचं कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत राणे समिती व तावडे समितीच्या अहवालात फरक काय? असा सवाल करत मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर तो कोर्टात सादर केला जाईल. पण तावडे समितीच्या अहवालावर सरकारने शपथपत्र का दिले नाही ? असा सवाल केला.

 

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *