Breaking News

मराठ्यांचा महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार ; या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे १ नोंव्हेंबरला लालबाग ते ठाणे संघर्ष यात्रा

मुंबई : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे रविवारी दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे . मराठा आरक्षणाबाबत सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती बाबत होणारे नुकसान यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी  व सध्या आरक्षणाची व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबई तर्फे संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर संघर्ष यात्रा ही सकाळी दक्षिण मुंबई येथील लालबाग पासून सुरू होणार असून व त्याची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

लालबाग येथून निघालेली ही संघर्ष यात्रा सायन, कुर्ला, चेंबूर ,मानखुर्द, घाटकोपर , कन्नमवार नगर व भांडुप याठिकाणी थांबून तेथील समन्वयक व कार्यकर्त्यांसोबत सभा घेऊन मराठा आरक्षणाची सद्यस्थिती व राज्य सरकार बाबतची अस्वस्थता आणि त्याबाबतची आंदोलनाची पुढील दिशा या बाबत चर्चा होईल व त्यानंतर सदर यात्रेची सांगता ही ठाणे येथे होईल. सदर संघर्ष यात्रेत जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे करण्यात आले.

त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा इशारा देण्यात येत आहे की सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पाऊले उचलावीत अन्यथा आता समाज शांत बसणार नाही. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांकडून सुद्धा ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य होत आहेत त्याचा सुद्धा निषेध मराठा क्रांती मोर्चा महामुंबई करत असून मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण व मराठा उपसमितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी सदर उपाय समितीतून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *