Breaking News

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आमदार गजभिये आणि प्रविण भोटकर यांच्या प्रयत्नांना यश

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणाचाच नव्हे तर प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून मंत्रालय असून या मंत्रालयाच्या इमारतीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले नव्हते. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
प्रकाश गजभिये आणि सामाजिक कार्यकर्त्ये प्रविण भोटकर यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर डॉ. आंबेडकरांचे आणि संविधानाचे प्रस्ताविका बसविण्यात येणार आहे. याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ९ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अरविंद सावंत, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सर्व पक्षांचे गटनेते आदी उपस्थित राहणार आहेत.
मुख्य इमारतीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र आणि मागील इमारतीमध्ये राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आलेले नसल्याची बाब लक्षात येताच राज्याच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांनी हेरली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संयुक्तरित्या राज्य सरकारच्या ही बाब लक्षात आणून दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार आर.टी.कांबळे यांनी काढले आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *