Breaking News

मॉन्सून काळात मेट्रोच्या कामाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम होणार नाही मुंबई मेट्रोचा दावा : नियंत्रण कक्षाची स्थापना करणार

मुंबई: प्रतिनिधी

मान्सून काळात मुंबई महानगर पालिकेच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मॉन्सूनची कामे करण्यास कंत्राटदारांना मुंमरेकॉने अर्थात मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने सूचना दिल्या आहेत.  पर्जन्य जल वाहिन्याची सफाई कामे, पर्जन्य जलवाहिन्या वळविण्याची कामे, पूरप्रवण भागात सिडीमेन्टेशन टाक्या बांधणे, पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपाची व्यवस्था करणे इत्यादी कामे कॉर्पोरेशनद्वारे पूर्ण झाली असून काही ठिकाणी प्रगतीपथावर आहेत व १ जून पर्यत पूर्ण होणार आहेत. याशिवाय अतिवृष्टीदरम्यान मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या समस्यांच्या निवारणासाठी कॉर्पोरेशनद्वारे नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे काम विना अडथळा व्हावे व नागरिकांना असुविधा होऊ नये यासाठी मुंमेरेकॉमार्फत काही परिसरात अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये जेव्हिएलआर येथील पर्जन्य वहिनीच्या कामाचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने जेव्हिएलआर येथील पर्जन्य वाहिनीचा उतार बदलविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय पुरप्रवण सांताक्रूझ परिसरात पर्जन्य वाहिन्यांची सफाईकरून त्यांना योग्य ठिकाणी वळविण्यात आलेले आहे. वांद्रे कुर्ला संकुल परिसरानजीक जगत विद्या मार्ग येथे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या परवानगीने ३ मी x २ मी ची पर्जन्यवाहिनी प्रस्तावित मेट्रो-३ च्या स्थानकापर्यत वाढविण्याचे काम सध्या सुरू असून ते १ जून पर्यंत पूर्ण होणार आहे. जगत विद्या मार्ग मेट्रो-३च्या बांधकाम स्थळापासून लांब असले तरीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुविधेसाठी मुं.मे.रे.कॉद्वारे पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात येणार आहेत.

कामांच्या व्यवस्थापनाविषयी बोलताना मुं.मे.रे.कॉच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, “मुं.मे.रे.कॉ मुंबईकरांसाठी उपयुक्त सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबवित आहे. आम्ही बृहन्मुंबई महानगर पालिकेसोबत समन्वय ठेवत मान्सून पूर्व कामे करीत आहोत. मेट्रो-३ ची बांधकाम स्थळांचे व्यावसायिकरित्या नियोजन केले जात असून पावसाळ्या दरम्यान मेट्रो-३च्या कामांमुळे नागरिकांना कुठलीही असुविधा होणार नाही.”

बृहमुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान तसेच पाहणी दौऱ्या दरम्यान दिल्या गेलेल्या सूचनाचे पालन कटाक्षाने केले जात असून अतिवृष्टीच्या परिस्थितीत बृहन्मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शना अंतर्गत अतिरिक्त उपाय योजना राबविण्यात येतील.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *