Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह या १२ जणांचे राजीनामे घेतले प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, संतोष गंगवार, डॉ.हर्षवर्धन, निशांख, गहेलोत यांचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असलेल्या चर्चेला अखेर आज मुर्त स्वरूप आले आहे. नव्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेंकर यांच्यासह १२ जणांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी घेतले.

दिड वर्षापासून कोरोना काळात आपल्या मंत्री पदानुसार योग्य ती जबाबदारी पार पाडली नाही म्हणून या १२ मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये कोविड-१९ चा काळ सुरु असतानाही आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आपली जबाबदारी नीट जबाबदारी पार पाडली नाही. त्यांच्यामुळे कोविडची परिस्थिती हाताळणीमुळे नरेंद्र मोदी हे नेहमीच टीकेचे धनी ठरले. त्यामुळे विद्यमान मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात आला. तसेच कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या कार्यकाळात ट्विटर, फेसबुक यांच्याबरोबर संघर्षास सुरुवात केल्याने आणि नव्या आयटी कायद्यामुळे कायदा मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने प्रसाद यांचा राजीनामा घेण्यात आला.

मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनाही शैक्षणिक क्षेत्रात फारसा ठसा उमटविता आला नाही. त्यामुळे त्यांचाही राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तर लॉकडाऊन काळात स्थलांतरीत कामगारांच्या प्रश्नावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्याचे खापर कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यावर टाकत त्यांना याप्रश्नी राजीनामा द्यायला सांगण्यात आले आहे.

राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे खालील प्रमाणे-

कृषी मंत्री डि.व्ही.सदानंद गौडा

कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद

सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक

आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार

राज्यमंत्री बाबुल सुप्रिओ

संरक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे

मंत्री रतन लाल कटारीया

राज्य मंत्री प्रतापचंद्र सारंगी

मंत्री सुश्री देबश्री चौधरी

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *