Breaking News

देशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

मुंबईः प्रतिनिधी

भारताबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली असून आगामी वर्षभरात उणे ८ टक्के तर उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात उमे ९.० टक्के वाढ होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फक्त कृषी क्षेत्रात सरळ ११.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल आज सकाळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पटलावर ठेवला.

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अभिभाषणात १०१९-२० या कालावधीत महसूली उत्पन्नात ३५ टक्क्यांची तूट आल्याचे जाहिर केले होते. तसेच आगामी काळात हि तूट भरून निघेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे आगामी २०२०-२१ या वर्षात त्यादृष्टीने उणे ८ टक्के अर्थव्यवस्था दरवाढीचा वेग दर्शविण्यात आला. कोरोनामुळे गेल्या वर्षात जवळपास ८ महिने लॉकडाऊन लागू केल्यामुळे सर्व आर्थिक व्यवसायाची केंद्रे बंद होती. अनेकांचे रोजगार आणि व्यवसाय बंद पडले. त्याचा परिणाम होवून राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्याच्या महसूली उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात तूट आल्याचे दिसून आले.

२०१९-२० च्या तुलनेत यंदाच्या वर्षी स्थूल राज्य उत्पन्न १ लाख ५६ हजार ९५६ कोटी इतकी घट अपेक्षित आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नही घटणार असून गेल्यावर्षी स्थूल उत्पन्न २ लाख २ हजार १३० कोटी होते. तर यंदा त्यात घट होवून १ लाख ८८ हंजार ७८४ इतकी घट होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर राजकोषिय तूट २०२०-२१ नुसार स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण २.१ टक्के तर २०२०-२१ मध्ये राज्याच्या स्थूल उत्पनाशी तुलना करता कर्जाचे प्रमाण १९.६ टक्के आहे.

वार्षिक कर्ज योजना- सन २०२०-२१ मध्ये कृषी व संबधित क्षेत्रात ९३ हजार ६२६ कोटी होते. सन २०२०-२१ डिसेंबर अखेर ४० हजार ५१५ कोटी इतके पीक कर्ज वाटप केले.

राज्यातील महागाईचा दर-

कोविड लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे २०२० मध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गोळा करण्यात अडचणी आल्याने परिणामी ग्राहक किंमतीचा निर्देशांक मोजणी या कालावधीकरीता शक्य झाले नाही. त्यामुळे महागाई वाढीचे आकडे उपलब्ध होवू शकले नाहीत.

मात्र कोरोना कालावधीत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सप्टेंबर २०२० अखेर ९.७ कोटी इंटरनेट वापरकर्ते झाले आहेत. देशाच्या तुलनेत राज्यातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *