Breaking News

मराठी चित्रपटांची प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित ५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव-२०१८

मुंबई : प्रतिनिधी

५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी इडक, रेडू, झिपऱ्या,नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम नाही, असेही एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज-एक होरायझन, मुरांबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता प्रभो शिवाजी राजा, कॉपी, अ ब क या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी पिप्सी, ह्दयांतर, पळशीची पी.टी यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून सुरेश खरे, अरुण म्हात्रे, नरेंद्र पंडीत, अनंत अमेम्बल, केशव पंधारे, विजय कदम, शरद पोळ, नरेंद्र कोंद्रा, श्रीमती अंजली खोबरेकर, शरद सावंत, जाफर सुलतान, अशोक राणे, सतीश रणदिवे आणि श्रीमती कांचन अधिकारी यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार ३० एप्रिल २०१८रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

तांत्रिक व बालकलाकार विभागातील घोषित पारितोषिके

उत्कृष्ट कलादिग्दर्शन – विनायक काटकर (झिपऱ्या) कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट छायालेखन – अर्चना बोराडे (इडक) कै. पांडूरंग नाईक पारितोषिक रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट संकलन – देवेन्द्र मुर्डेश्वर (झिपऱ्या) रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण – दिनेश उचील (पल्याडवासी) रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट ध्वनीसंयोजन – रसूल पुकुटी-अर्णव दत्ता (क्षितीज-एक होरायन) रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट वेशभूषा –

प्रकाश निमकर (झिपऱ्या) रु. ५०,०००/- व मानचिन्ह, उत्कृष्ट रंगभूषा – श्रीकांत देसाई (रेडू) रु. ५०,०००/-  व मानचिन्ह, उत्कृष्ट बालकलाकार – साहिल जोशी-मैथिली पटवर्धन (अ ब क – पिप्सी) कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि रु. ५०,०००/- व मानचिन्ह

 

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *