Breaking News

महाराष्ट्रात लव्ह जिहाद? भाजपाला पडला आपल्याच नेत्याच्या भाचीच्या लग्नाचा विसर कायद्याच्या मुळ चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न

मुंबई : विशेष प्रतिनिधी

देशातील भाजपा शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यासह करत अन्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी करताना भाजपामधील एका बड्या  नेत्याच्या भाचीने मुस्लिम मुलाशी केलेल्या लग्नाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. तसेच या मागणीतून राज्यघटनेच्या मुळ गाभ्याला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

साधारणत: एक ९ महिन्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव रामलाल यांची भाची श्रीया गुप्ता हीने उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते सरहीता करीम यांच्या मुलगा फैझान करिम याच्याशी विवाहबध्द झाली. त्यावेळी लग्नाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी, दिनेश शर्मा, मंत्री सुरेश खन्ना आणि नंद गोपाल नंदी आदी उपस्थित होते. हा लग्न संमारंभ लखनौ शहरातील पंचताराकित ताज-विवंता या हॉटेलमध्ये पार पडला होता. याविषयीचे वृत्त द प्रिट या संकेतस्थळाने १९
फेब्रुवारी २०१९ रोजी प्रकाशित केले होते.

यापूर्वीही भाजपाच्या नेत्यांकडून केरळ, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा कांगावा केला होता. मात्र त्यावेळी झालेल्या हिंदू-मुस्लिम मुलांच्या लग्नात लव्ह जिहाद सारखे षडयंत्र झाल्याचे आढळून येत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तर केरळमधील एका हिंदू-मुस्लिम जोडप्याने केलेल्या लग्नाच्या तपासणीसाठी केंद्र सरकारने एनआयए राष्ट्रीय तपास यंत्रणेला नेमले होते. या तपास यंत्रणेनेही लव्ह जिहाद सारखा कोणताही प्रकार नसल्याचा निर्वाळा दिला होता.

पुरोगामी महाराष्ट्रात तर आशयाची कोणतीही घटना आतापर्यत घडल्याचे पोलिस यंत्रणेकडे नोंद नाही. तसेच अशा पध्दतीचे एखादे षडयंत्र एखाद्या मुस्लिम संघटनेकडून राबविले जात असल्याची गुप्तचर विभागाकडे माहिती नाही. त्यामुळे भाजपाच्या मागणीतला फोलपणा दिसून येत आहे.

याशिवाय राज्य घटनेतील कलम २५ अन्वये देशातील प्रत्येकाला आपला धर्म, जात याचे पालन सदसदविवेक बुध्दीनुसार आचरण करण्याची परवानगी देत आहे. तर सध्या असलेल्या लग्न कायदा अर्थात मॅरेज अॅक्टनुसार वयात किंवा सज्ञान असलेल्या मुला-मुलीला आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न करण्याचा अधिकार देत असल्याचे राज्य घटनेतील या दोन्ही तरतूदी पाह्यल्या कि आपल्या लक्षात येते. विशेष म्हणजे धर्म आणि ऐच्छिक व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा राज्य घटनेने दिलेला अधिकार हा मुलभूत अधिकारात मोडत असल्याने भाजपाकडून या मुलभूत अधिकारावरच गदा आणण्याचा प्रयत्न दिसत आहे.

त्यामुळे केवळ आगामी निवडणूकांच्यादृष्टीने मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने राज्यात लव्ह जिहाद कायदा आणावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

One comment

  1. महाराष्ट्रात love jihad… घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावण्याचा प्रयत्न ????
    भाजप नेत्याच्या भाचीने अंतरधमीय विवाह एका मुझलिं मुलाबरोबर केला.. पण ह्या मुलीला तिच्या सासरी चांगली वागणूक मिळत असेल… मामा कंगे राजकीय वजन पाहता मुस्लिम नवरा त्या मुलीला काहीही इजा पोहोचवणार नाही.. म्हणुन देशात इतर मुलीवर अत्याचार, लव्हजिहाद होताच नाही असे म्हणणेच मूर्खपणाचे ठरेलं… जर आशा घटना घडल्याचं नसत्या तर हा काळजी करण्यासारखा मुद्दा झाला च नसता.. ह्यासाठी ह्यावर कडक निर्बंध अपेक्षित आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *