Breaking News

वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार वीज मंत्र्यांच्या उत्तराच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर वीजच्या रकमेची थकबाकी आहे. मात्र काही वीज बीलांच्या रकमेत तांत्रिक कारणामुळे अवाच्या सव्वा वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ ते ५ हजार रूपये भरावे असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून जे शेतकरी सांगितलेली रक्कमही भरणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा करणारे रोहीत यंत्र आणि वीज जोडणी तोडण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शेतकऱ्यांची वीज पुरवठा तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असल्याच्या घोषणा देत सभात्याग केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान धुळे जिल्ह्यातील कापडमे उपकेंद्रातील रोहीत्र यंत्र बंद करण्याचा घेतलेला निर्णयाचा मुद्दा काँग्रेसचे कुणाल पाटील यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वरील घोषणा केली.

शेतकऱ्यांकडे जवळपास २० हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. मात्र थकबाकीची सर्वच रक्कम भरण्यापेक्षा अवघे ३ किंवा ५ हजार रूपये भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. तसेच जे शेतकरी वीज बील भरणार नाहीत त्यांचा वीज पुरवठा नोटीस दिल्यानंतर तोडण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सर्वपक्षिय सदस्यांनी उपप्रश्न विचारत शेतकऱ्यांच्या वीज जोडणी तोडण्यापूर्वी त्यांना काही सवलत द्यावी अशी मागणी केली.

यावेळी अजित पवार यांनीही याबाबत उपप्रश्न उपस्थित करत म्हणाले की, शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहीत्र यंत्र संच बंद करण्याऐवजी एखाद्या भागातील १० पैकी ५ शेतकऱ्यांनी वीज बीलाची भरणा केल्यास ते यंत्र बंद करून नये. तसे केल्यास वीज बील न भरणारे शेतकरी आणि भरणारे शेतकऱ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे वीज पुरवठा करणारे यंत्र बंद करू नये अशी मागणी केली.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही शेतकऱ्याची वीज जोडणी ही त्याला नोटीस दिल्यानंतरच तोडली जाते. जर शेतकऱ्यांनी वीज बील भरले नाहीच. तर त्याची वीज जोडणी तोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत तुम्ही ही मंत्री होतात. तुम्हालाही याची कल्पना असल्याचे अजित पवार यांना सांगितले.

ऊर्जामंत्र्याच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सरकार विरोधी घोषणा देत सभात्याग केला.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *