Breaking News

मंत्रिमंडळ विस्तारात मराठा, बौध्द, मुस्लिम, ओबीसी, जैन आणि महिलांना स्थान महाविकास आघाडीचे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठा समाजाबरोबरच बौध्द, मुस्लिम आणि महिला समाजाला मोठ्या प्रमाणावर समावेश करत सामाजिक स्तरावरील सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारच्या आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजातील प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला. तर बौध्द समाजातील २ आणि पूर्वीचा एक असे मिळून तीन जणांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय मुस्लिम समाजातील एकूण ४ जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून हे तीन्ही मंत्री कँबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यापैकी दोन मंत्री हे राष्ट्रवादीचे तर एकजण काँग्रेसचा आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून दोन महिलांना मंत्रीपद देण्यात आले. तर राष्ट्रवादीने एका महिलेला राज्यमंत्री पद देण्यात आले. ओबीसी समाजातील २, वंजारी समाजातील २, बंजारा समाजातील १, जैन १, सीकेपी ब्राम्हण २, सारस्वत ब्राम्हण १, धनगर १ असे मिळून समाजातील सर्वच घटकांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सर्वच समाजातील आमदारांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला.
या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काँग्रेसच्यावतीने पश्चिम महाराष्ट्राला ३ मंत्रिपदे, विदर्भाला ४, मराठवाड्याला २ आणि मुंबईला २ मंत्रिपदे दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईला २, पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक ७ मंत्रीपदे, उत्तर महाराष्ट्राला १, मराठवाड्याला ३, कोकणला १, विदर्भाला २ मंत्रिपदे दिली.
शिवसेनेकडून मुंबईला ४ आणि ठाणे जिल्ह्याला १ मंत्रिपद दिले. कोकणात २, उत्तर महाराष्ट्राला २, पश्चिम महाराष्ट्रातील ३ मंत्रिपदे, विदर्भाला २, मराठवाडा ३ आधी भागातील लोकप्रतिनिधींना प्रतिनिधीत्व देण्यात आले.
भाजपा-शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री म्हणून एकमेव पंकजा मुंडे यांचा समावेश होता. तर मुस्लिम समाजातील एकाही व्यक्तीला मंत्री आणि विधानसभेच्या निवडणूकीत तिकिट देण्यात आले नव्हते.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *