Breaking News

अर्थसंकल्प राज्याचा दृष्टीक्षेपात महत्वाच्या घोषणा

मुंबईः प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणूकीला अवघ्या तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला जास्तीत जास्त खुष करण्याच्या अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतूदी करण्यात आल्या. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला.

  • गावठाण जमाबंदी प्रकल्पातंर्गत राज्यातील ३९ हजार ७३३ गावांचे जीआयएस मॅपींग तयार करण्यात येणार असून या करीता रु. ३७४ कोटी खर्च अपेक्षित.
  • सहकारी तत्वावरील वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठ सहकारी सुत गिरण्यांच्या मदतीसाठी आकृतीबंधात सुधारणा करण्याचा निर्णय
  • राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना दिर्घ मुदतीच्या कर्जाच्या व्याज अनुदानापोटी रु. ३६७ कोटी ८३ लाख गेल्या ४ वर्षात‍ वितरीत, वस्त्रोद्योग घटकांना १० टक्के अर्थसहाय्य म्हणून रु. १८० कोटी ८९ लाख एवढा निधी वितरीत
  • खनिज ई लिलावाच्या माध्यमातून नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी व चंद्रपूर या जिल्हयातील खनिज क्षेत्र परिसरात मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होउन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, खनिज क्षेत्र लिलावामुळे सुमारे ३ हजार ५६२ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल राज्यास प्राप्त होणार
  • सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढीवर भर देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाकरीता पार्क तयार करणार, सुरूवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून ५० तालुक्यांमध्ये पार्कची निर्मिती प्रस्तावित
  • राज्यातील होतकरु युवक, युवतींसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करणार, या योजनेतंर्गत या वर्षात १० हजार लघुउद्योग सुरु करण्याचे नियोजन, या योजनेत महिला तसेच अनुसूचित जाती जमातींना प्राधान्य
  • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन डॉलर म्हणजे रु. ७० लक्ष कोटी करण्याच्या लक्ष्य पुर्तीसाठी महाराष्ट्र आर्थिक‍ विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करणार, यासाठी चालू आर्थिक वर्षात रु. २० कोटी एवढा नियतव्यय राखीव
  • नागपूर जिल्हयातील कोराडी येथे १३२० मेगावॅट क्षमतेच्या नव्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला मान्यता, यासाठी ८ हजार ४०७ कोटी रु. खर्च अपेक्षित

९)  वीजवितरण प्रणालीचे वृध्दीकरण व आधुनिकीकरण करण्याकरीता नविन वीज उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय, राज्यात ४९३ उपकेंद्र उभारण्यात आली असून व २१२ उपकेंद्राची क्षमता वृध्दी

१०) ४.५ वर्षात १४० जलसंधारण प्रकल्प पूर्ण.

११) कृषी पंपाना वीज जोडण्या देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय, यासाठी रु. ५ हजार ४८ कोटी १३ लक्ष खर्च अपेक्षित

१२) गेल्या ४ वर्षात कृषी ग्राहकांना रु. १५ हजार ७२ कोटी ५० लक्ष, यंत्रमागधारकांना ३ हजार ९२० कोटी १४ लक्ष व औद्योगिक ग्राहकांना ३ हजार ६६२ कोटी २९ लक्ष वीज दराच्या सवलतीपोटी अनुदान

१३) गेल्या ४ वर्षात ५ लाख २६ हजार ८८४ कृषी पंपाना वीज जोडणी, यावर ५ हजार ११० कोटी ५० लक्ष इतका खर्च

चालू आर्थिक वर्षात नगरविकास विभागाकरीता एकत्रित ३५ हजार ७९१ कोटी ८३ लक्ष ६८ हजार रु. तरतुद

१४) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातंर्गत आतापर्यत रु. २ हजार २०० कोटी किमतीचे ४० प्रकल्प

१५) रु.१७ हजार ८४३ कोटी किमतीच्या शिवडी न्हावा शेवा मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, प्रकल्प २०२२ पर्यत पुर्ण करण्याचे नियोजन

१६) रु. ११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष‍ किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पुर्ण करण्याचे नियोजन

१७) सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल ३ च्या बांधकामासाठी रु. ७७५ कोटी ५८ लक्ष इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता

१८) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित, काम प्रगतिपथावर

नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेस चे कार्यारंभ आदेश

१९) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पुर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर

२०) रस्ते विकास योजनेतंर्गत सन २००१-२०२१ मध्ये एकूण ३ लाख ३६ हजार ९९४ किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट, आतापर्यत २ लाख ९९ हजार ४४६ किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित

२१) भावांतर योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात आणखी रु. ३९० कोटी निधी उपलब्ध करणार

२२) सहकारी संस्थाच्या नाविण्यपुर्ण प्रकल्पांशी संबंधित अटल अर्थसहाय्य योजनेकरीता रु. ५०० कोटी निधी उपलब्ध

२३) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी रु. २४ हजार १०२ कोटी मंजूर

२४) नीलक्रांती अभियानातंर्गत ससून गोदी बंदराचे आधुनिकीकरण, रायगड जिल्हयातील करंजा येथे मासेमारी बंदराची निर्मिती, वेंगुर्ल्यातील वाघेश्वर येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती, ९० टक्के अनुदानावर शेतकरी गटांना मासळी विक्रिसाठी फिरते वाहन या योजना राबविणार

२५) गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची व्याप्ती वाढविली, सदर योजनेसाठी रु. ३४ कोटी ७५ लक्ष इतकी तरतूद

२६) राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार

२७) दुध उत्पादक शेतक-यांना अनुदान, दुधसंघ व खाजगी दुग्ध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन म्हणून रु. ४७४ कोटी ५२ लक्ष इतका निधी वितरीत

२८) कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी रु.१०० कोटी उपलब्ध करणार

२९) २ हजार २२० कोटी रु. किमतीचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्ततन प्रकल्प राबविणार

३०) सामुहिक गटशेतीसाठी चालू आर्थिक वर्षात रु. १०० कोटी इतका नियतव्यय राखीव

३१) मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता

३२) कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी रु.२०० कोटी नियतव्यय राखीव, मूल जि. चंद्रपूर, हळगाव जि. अहमदनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालये तर यवतमाळ आणि पेठ जि. सांगली येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये स्थापन होणार

३३) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात रु २१० कोटी इतका नियतव्यय राखीव

३४) २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर

सुक्ष्म सिंचनासाठी रु. ३५० कोटी इतका नियतव्यय राखीव

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राज्य अभिसरण आराखडयाची अंमलबजावणी

३५) मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षात २५ हजार शेततळी पुर्ण करण्याचे उद्दीष्ट, याकरीता रु. १२५ कोटी नियतव्यय प्रस्तावित

३६) मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजार तरतूद

३७) जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लक्ष २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पुर्ण, त्यामाध्यमातून २६.९० टीएमसी पाणीसाठा क्षमता निर्माण, या योजनेवर रु. ८ हजार ९४६ कोटी खर्च.

३८) सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागाकरीता रु. १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजार तरतूद

खुल्या कालव्यांऐवजी नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचे धोरण, त्यामुळे भुसंपादनाच्या खर्चात बचत

३९) साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता

४०) बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता रु. १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद

४१) प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी सन २०१९-२० या वर्षात रु. २ हजार ७२०‍ कोटी एवढी भरीव तरतूद

४२) गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पुर्ण करण्याचे नियोजन

४३) राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश, सदर प्रकल्पांची उर्वरित किंमत २२ हजार ३९८ कोटी असून त्यापैकी ३ हजार १३८ कोटी केंद्रीय अर्थसंकल्प प्राप्त होणार.

४४) मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पुर्ण, प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध्यम प्रकल्प व उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश

४५) मागील साडेचार वर्षात ३ लक्ष ८७ हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन समता आणि १ हजार ९०५ दक्षलक्ष घनमीटर (६७ टीएमसी) पाणीसाठा निर्माण

४६) नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ रु. ६ हजार ४१० कोटी एवढी तरतूद अर्थसंकल्पात असून त्यानंतरही आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करणार.

४७) सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता

४८) राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ

४९) जमिन महसूलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय

५०) टंचाई व दुष्काळग्रस्त शेतक-यांना विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य, शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी

५१) म.रा. मार्ग परिवहन महामंडळामार्फत राज्यातील बसस्थानकांच्या नूतनीकरणाच्या कामांसाठी रू. १३६ कोटी ५१ लक्ष इतका खर्च

५२) ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासनातर्फे घरकुल बांधून मिळणार, यासाठी १०० कोटी रू. नियतव्यय राखीव

५३) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर ५ लक्ष ७८ हजार १०९ घरांपैकी ४ लक्ष २१ हजार ३२९ घरे बांधून पूर्ण, उर्वरित ६ लक्ष ६१ हजार ७९९ लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्याचे नियोजन

५४) ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी रु. २०० कोटी इतका निधी राखीव

५५) ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक असलेल्या १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कुटीरोद्योग, लघुद्योग यांना प्रोत्साहन देणार, यासाठी १०० कोटी रु. निधी राखीव

५६) राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षात १५० कोटी रु. निधी राखीव

५७) राज्यातील श्रीक्षेत्र कपिलधारा, श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी, कुणकेश्वर व आंगणेवाडी, सदगुरु सखाराम महाराज अमळनेर‍, निवृत्तीनाथ मठ या तीर्थक्षेत्रातील यात्रेकरुंच्या सोयीकरीता तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातर्गत रु. ५० कोटी इतका निधी राखीव

५८) सार्वजनिक जय मल्हार व्यायामशाळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती संग्राहालय उभारण्याचा निर्णय

ग्रामीण भागातील ५७ गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्यासाठी रु. ३५.६४ कोटी इतका निधी उपलब्ध, या आर्थिक वर्षात आणखी काही गावात सभागृह बांधणार

 

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *