Breaking News

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या कोपरखळीने सभागृहात उडाला हास्यकल्लोळ फास्टॅग कोणाला लावायचा आमदारांना कि गाडीला?

मुंबईः विशेष प्रतिनिधी

भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे गंभीर स्वरूपाचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. मात्र एखादा प्रसंग घडला किंवा कोणी त्यांची टोपी उडविली तर त्यास हसून दाद ही देतात. परंतु कधी स्वतः कोणाची खिल्ली किंवा टोपी उडविण्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र आज त्यांनी केलेल्या विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीच टोपी उडविल्या विधानसभेत चांगलीच हास्याची लकेर उमटली.

दुपारी सभागृहात औचित्याच्या मुद्यावरील चर्चा झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व आमदारांच्या वाहनासाठी एचडीएफसी बॅंकेकडून फास्टॅगचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती देण्यास सुरूवात केली. मात्र झिरवळ यांना फास्टॅगचा उच्चार काही करता येईना. त्यामुळे त्यांनी फास्टींग, तर कधी फास्टग तर कधी अन्य उपचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहातील सदस्यांसमोर उपाध्यक्ष झिरवळ नेमकी कशाची माहिती देत आहेत याचा उलगडा होईना. अखेर भाजपामधील एका सदस्यांने फास्टॅग असा उच्चार करता त्यानुसार उपाध्यक्ष झिरवळ यांनीही त्याचा पुर्नरूच्चार केल्यावर मग सर्व आमदारांना फास्टॅगचे वाटप सुरु झाल्याची माहिती कळाली.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले आणि मिश्किल स्वरूपात उपाध्यक्ष झिरवळांना विचारले की, “फास्टॅग नेमके कशाला लावायचे आमदारांना कि गाडीला”.

त्यावर सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला. मात्र उपाध्यक्ष झिरवळ यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. यानिमित्ताने फडणवीसांमध्ये लपलेला मिश्किली आणि कोपरखळीचा स्वभावही यानिमित्ताने इतर आमदारांना दिसून आला.

Check Also

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *