Breaking News

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतः समितीची बैठक २९ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरला यावरून उलट सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच होणार असून या त्यासंदर्भातील तारखा निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
तसेच अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
नियोजित पध्दतीनुसार हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार होते. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नागपूरला प्रवास करणे शक्य होणार नाही. सुरुवातीला शस्त्रक्रियेनंतर लगेच त्यांना आराम पडेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र आता त्यांच्यावर फिजोथेरीपीचे उपचार सुरु करण्यात आल्याने हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नसल्याचा अंदाज बांधण्यात येवू लागला. त्यानुसार यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
तसेच संसदीय कामकाज सल्लागार मंडळाची बैठक २९ तारखेला होणार असून त्यामध्ये अधिवेशन नेमके किती दिवसाचे आयोजित करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, विधिमंडळ हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात २२ ते २८ डिसेंबरला मुंबईत आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याबाबत अधिकृत शिक्कामोर्तब २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *