Breaking News

लहान मोठ्या व्यावसायिक – उद्योजकांना एकत्र घेऊन येणारे हक्काचे फर्स्ट महा मार्ट.कॉम लोकल व्यवसायाचे ग्लोबल मार्केटिंगसाठी एकमेव डिजीटल प्लॅटफॉर्म

पुणे : प्रतिनिधी

देशासह संपूर्ण महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, तर बरेच उद्योग, व्यवसाय अजुन ही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाचा कहर आणि त्याचा लहान मोठे उद्योग, व्यवसायिकांवर होणारा परिणाम हा दुरगामी स्वरूपाचा असणार आहे. आरोग्याची काळजी असल्याने सामान्य नागरिक पूर्वी प्रमाणे विनाकारण बाहेर जाणे, खरेदी साठी गर्दीत जाणे टाळत आहे. ग्राहकही भाजी पासून ते इतर आवश्यक गोष्टी ऑनलाइन कशा उपलब्ध होतील यासाठी तर व्यावसायिक, उद्योजक ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल, त्यासोबतच  बाजारपेठ कशी उपलब्ध होईल हा विचार करत आहे, पण आता महाराष्ट्रातील लहान मोठ्या उद्योजक, व्यावसायिक आणि सेवा पुरवठादार यांना आपला लोकल व्यवसाय ग्लोबल करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे, www.firstmahamart.com च्या रूपाने.

पुणेस्थित, पब्लिक रिलेशन आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या केतन महामुनी या युवकाची ही संकल्पना आज भरारी घेण्यास आणि अनेकांना उभारी देण्यास सज्ज आहे. फर्स्ट महा मार्ट हा महाराष्ट्रातील पाहिला ग्लोबल प्लेटफार्म असणार आहे जिथे लाखो ग्राहक – व्यावसायिक – उद्योजक – सेवा पुरवठादार एकत्र येवून आपल्या व्यवसायाला गती देण्याचे काम करत, उद्योगाची प्रगती साधू शकणार आहेत. ग्राहकांसाठी उत्पादक, व्यावसायिक, उद्योजक यांची संपूर्ण माहिती, संपर्क जिओ लोकेशन सह उपलब्ध असणार आहे. उत्पादक,
उद्योजक, सेवाक्षेत्रातील व्यावसायिक यांना स्वतंत्र प्रोफाइल पेज, प्रोडक्ट गैलरी, प्रोफाइल, केटलॉग डाउनलोड, लाइव चॅट, अपॉइंटमेंट बुकिंग सह अनेक आधुनिक फिचर यामध्ये देण्यात आले आहेत. उत्पादक, उद्योजक, व्यावसायिक, सेवा पुरवठादार आणि ग्राहक यांना एकत्र घेऊन येणारा हा एकमेव प्लेटफार्म असून थेट संपर्क होत असल्याने ग्राहकांना आणि व्यवसायिकांना याची निश्चितच मदत होणार आहे.
लॉकडाउन मध्ये अनेक नवनवीन प्रयोग व्यावसायिकांनी केले, ग्राहकांपर्यंत पोहोचायच कसे, ग्राहकही खात्रीलायक विक्रेते मिळणार कुठे या शोधात असल्याचे जाणवले. बिजनेस ऑनलाइन येणे म्हणजे वेबसाइट असणे, सोशल माध्यमांवर पेज तयार करणे आणि डिजिटल कार्ड बनविणे हीच व्याख्या समोर येत होती पण ग्राहक त्या वेबसाइट, सोशल पेज पर्यंत पोहोचणार कसा याचा लॉंग टर्म पेड प्लान सर्वांना परवडेल असा नव्हता. आज काही नामांकित बिजनेस लिस्टिंग कंपन्यांचे वार्षिक मोठे मोठे पॅकेजेस आहेत, काही कमिशन घेतात, ज्यामुळे
सर्वच व्यवसायिकांना त्यांची सेवा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील उत्पादक, व्यावसायिक, सेवा क्षेत्रातील इतर उद्योजक आणि ग्राहक यांना थेट जोडणारे हे अनोखे हक्काचे व्यासपीठ अत्यल्प शुल्कामध्ये उपलब्ध करुन देण्याची कल्पना मनात आली आणि फर्स्ट महा मार्ट सुरु करण्याचे  ठरविले, आज  महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण भागातील लहान व्यवसायिकांपासून सर्व उद्योजक, यांना निश्चितच याचा फायदा होईल असा विश्वास फर्स्टमहा मार्ट संस्थापक व FTPL चे संचालक  केतन महामुनी यांनी व्यक्त केला.

फर्स्ट महा मार्ट मधील बेसिक पॅकेजमध्ये व्यावसायिक विनामूल्य रजिस्टर होऊन ९० दिवस या सुविधेचा फायदा घेऊ शकणार आहेत, त्यानंतर अत्यल्प शुल्कामध्ये १२ महिने हि सुविधा उपलब्ध असणार आहे. www.firstmahamart.com सध्या  वेब पोर्टल स्वरूपात तसेच लवकरच मोबाईल अँड्रोइड ऍप्लिकेशन स्वरूपात सर्वांना उपलब्ध असणार आहे.व्यापाराला गती, उद्योगाची प्रगती टॅग लाइन असलेले फर्स्टमहा मार्ट येणाऱ्या काळात उद्योजकांना, व्यवसायिकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. संपर्क : केतन महामुनी 966054674

Check Also

राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी ‘कोरोना’ विषाणूशी सामना करीत विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *