Breaking News

आर्थिक अहवालातील आकडेवारी तपासणीसासाठी समिती नेमा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी

आर्थिक पाहणी अहवालातली आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. जगातल्या प्रसिद्ध अशा १०८ अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञांनी मार्च २०१९ मध्ये भारतात जी अर्थविषयक आकडेवारी दिली जाते, ती वाढवून सांगितली जात असल्याचे निवेदन दिले होते. त्याचे समर्थन करणारे वक्तव्य केंद्र सरकारने नेमलेले आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केले होते. त्यांच्या मते भारताचा विकासदर अडीच टक्के फुगवून सांगितला जात आहे. आजचा आर्थिक अहवाल राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. त्यातील आकडेवारीच्या खरेपणाबाबत संशय त्यांनी व्यक्त केला. जगातील प्रसिद्ध अर्थतज्ञांनी भारताची अर्थविषयक आकडेवारी वाढवून सादर केली जात असल्याचे निवेदन केले. आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनीही याचे समर्थन करत भारताचा विकासदर २.५%नी फुगवून सांगितल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी अहवालाच्या सत्यतेविषयी दाट संशय असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.

विधान परिषदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवाबाबत विरोधकांनी शंका घेतली आहे. आता याबाबत सरकार काय करणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Check Also

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *