Breaking News

मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत आहे.

मदन शर्मा यांचा फेसबुक प्रोफाईल सापडला असून त्यांच्या प्रोफाईलवर मर्चट नेव्ही असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच मदन शर्मा यांच्याशी संबधित व्यक्तींनी त्यांचे ओळखपत्र मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळास उपलब्ध करून दिले. त्यामुळे सोशल मिडियावर उपलब्ध असलेल्या माहितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समाजमाध्यमांवर मदन शर्मा यांची काही माहिती मिळते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न मराठी ई-बातम्या.कॉमकडून प्रयत्न केला असता ही माहिती हाती मिळाली.

 

(सदरचे ओळखपत्र मदन शर्मा यांच्याशी संबधित असलेल्या व्यक्तीने मराठी ई-बातम्याला पाठविले.)

https://www.facebook.com/profile.php?id=100012937032401  (शर्मा यांची फेसबुक लिंक)

 

 

Check Also

करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *