Breaking News

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. हा एकतर राजदंडाचा अपमान आहे किंवा राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान आहे असा आरोप माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचं हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजे मुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुदयावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सदस्य १० ते १५ मिनिटे राजदंड फिरवत राहिले. राजदंड दहा ते पंधरा मिनिटे फिरवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज तहकुब करायला हवे परंतु सभागृहाची परंपरा आणि प्रथा मोडीत काढत कामकाज रेटूत नेण्याची सरकारची मानसिकता ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे असाही आरोपही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Check Also

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *