Breaking News

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आमदार सतीश चव्हाण हाताच्या पंजावर लढविणार निवडणूक

औरंगाबाद : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच इतर उमेदवारांची नावे म्हणून जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी स्वतः यांच्यापैकी एक उमेदवार असेल,असेही त्यांनी सांगितले.
सोमवारी या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या नावांची यादी राहुल गांधी यांच्यापर्यंत पाठवण्यात आली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांचे नाव एक नंबरला तर दोन नंबरला माझे नाव आहे. डॉ. काळेंना उमेदवारी मिळाल्यास मी प्रचारप्रमुख म्हणून काम करेन. तर मला उमेदवारी मिळाल्यास डॉ. काळे हे प्रचारप्रमुख राहतील, असा आमचा निर्णय झाला आहे. निवडणुकीत रावश्याचा (दानवे) पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा पुर्नउच्चारही त्यांनी यावेळी केला.
तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तीन उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली असून, आमदार सुभाष झांबड यांचे नाव एक नंबर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीष चव्हाण आणि तिसऱ्या क्रमांकावर आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव आहे. झांबड यांना उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. १४ मार्चपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. यादिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची संयुक्‍त पत्रकार परिषद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. रविंद्र बनसोड यांच्याकडूनही काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, मात्र आता त्यांना गंगापूर विधानसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळले.
काँग्रेसने पळवला राष्ट्रवादीचा उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेसकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सतीष चव्हाण हे आमचे उमेदवार असतील, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादेत जाहीर केलेले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी सतीष चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुक लढवावी, असा एक पर्याय समोर आणण्यात आला आहे. काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुक लढण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या चर्चेत मान्य केल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *