Breaking News

टाळेबंदी हटवा अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवू वंचित बहुजन आघाडीचा इशारा!

मुंबई: प्रतिनिधी

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधित संसर्ग असलेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले. मात्र, सरकारने हॉटस्पॉट घोषित केलेल्या भागांमध्ये यावर्षा पेक्षा गेल्यावर्षी म्हणजेच २०१९साली जास्त लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य विभागाची ही माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे टाळेबंदी हटावावी आणि खऱ्या अर्थाने अनलॉक करावा. अन्यथा दहा ऑगस्ट नंतर रस्त्यावर येवून आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

दुकानांची सम-विषम ही पद्धत कधी संपवणार आहात? छोटे दुकानदार, टपरीवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ संकटात आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही. एसटी रस्तावर कधी धावेल त्याची तारीख सांगा. सरकार हे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर कधीही आम्ही रस्त्यावर उतरु असल्याचे सांगत

लोकांचे हाल होत आहेत. या महिन्यात पाऊस १५ दिवस पडणार असल्याचा अंदाज आहे. कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील धरणं ४० ते ७० टक्के भरले. पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोना-कोराना करण्याऐवजी पुराचे नियोजन सांगा. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. तरीही सरकार गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.

सरकारने फिक्स टाईमटेबल सांगावे. कधी काय सुरु करणार ते सांगावे. सध्या सर्व राम भरोसे सुरु आहे. सध्या सरकारी पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत. जिल्हाधिकारी निर्णय घेतात, हे चुकीचे आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. राज्य सरकार आणि केंद्र सरकार चालढकल करत आहेत. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईत बेस्ट मोठा संख्येने सुरु करा. सरकारने अनलॉक प्रत्यक्ष सुरु करावं. अन्यथा दहा ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरुन कधीही कायदा हातात घेऊ देत असा इशारा देत ८० टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीस का धरता? आता टाळेबंदी का? याबाबत स्पष्टीकरण द्यावे”, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

न्यायालयाचा चंद्रकांत पाटील यांना दिलासा मात्र आव्हान कायम निवडणूक शपथपत्राबाबतची याचिका न्यायालयाने निकाली काढली

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेली चंद्रकांत पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *