Breaking News

डाव्या पक्षांचा मोदी सरकार विरोधात पोल खोल हल्लाबोल आंदोलन २३ मे रोजी ठाणेसह देशभरात आंदोलन १०६ जन संघटना सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या चार वर्षात देशातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला असून सरकार ठिकठिकाणी अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात सहा  डावे पक्ष –  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एमएल लिबरेशन ),एसयुसीआय (कम्युनिस्ट ), फॉरवर्ड ब्लॉक ,आरएसपी – यांच्याशी संबंधित वर्गीय व जनसंघटनांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर,“जनएकता जन अधिकार आंदोलन” समन्वय समितीच्यावतीने देशभरात पोल खोल हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. २६ मे  २०१८ रोजी  भाजपप्रणित नरेंद्र मोदींच्या केंद्रीय सरकारच्या कार्यकाळाची चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने २३ मे २०१८ रोजी, देशभर, “पोल खोल  हल्ला बोल”-आंदोलन होत आहे.

मोदी सरकारची ४ वर्षें देशाला बरबादी कडे नेणारी होती. संविधान गुंडाळून मोदी सरकार लोकशाही विरोधी, जनविरोधी क़ायदे करणे, देशाच्या सर्व साधन संपती वर आपल्ल्या मूठभर corporate मित्रांचे नियंत्रण येइल असे धोरण आंखणे सुरू आहे.

नोटबंदी, जीएसटी करवाढ , बँक, रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, विमा शिक्षण,आरोग्य, यांत सरकारी गुंतवणुक वाढविण्याऐवजी त्यांचे खाजगीकरण करणे नोकर भरतीच्या थापा, मात्र प्रत्यक्षात प्रचंड  नोकर कपात सुरु सुरू, लहान उद्योग बंद करणारे कायदे, धार्मिक व जातीय एैक्य बिघडविणारे धोरण, भ्रष्टाचाराला खतपाणी, यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण आहे.२०१९  च्या निवडणुकीत   केंद्र व राज्य सरकार ला पायउतार करणे हाच पर्याय आहें. मोठया संख्येने जनता आंदोलनत सामिल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *