Breaking News

भाजपाच्या खट्टर सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार लाठीमारात १० शेतकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी

मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शने करण्यास सुरुवात केली. या निदर्शनक शेतकऱ्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी क्रुर पध्दतीने लाठीमार केला. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याने आता शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.

शनिवारी करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेले उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आले होते. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

शुक्रवारी शेतकरी नेत्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून भाजपा नेते आणि बैठकीचा विरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर करनालमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. सर्व ग्रामीण रस्ते सील करण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी दुपारी सव्वा बारा वाजता लाठीचार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून शेतकऱ्यांच आंदोलन मोडून काढण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची डोकी फोडून काढा असे म्हणाल्याचे स्पष्टपणे ऐकायला येत असल्याने पोलिसांवरील टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असून चंदीगड-दिल्ली महामार्गावर वाहतूकीच्या लांबाच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी केलेल्या लाठीजार्चमध्ये किमान १० शेतकरी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *